Breaking | नारायण राणेंच्या अटकेसंदर्भात बुधवारी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक
नारायण राणेंच्या अटकेसंदर्भात बुधवारी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, राणेंच्या अटकेचा निषेध कसा करायचा, यासंदर्भात या बैठकीत खलबतं होतील, असे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बचाव पक्षाकडून राणे यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केलाय. राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या अटकेसंदर्भात बुधवारी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अटकेचा निषेध कसा करायचा, यासंदर्भात या बैठकीत खलबतं होतील, असे म्हटले जात आहे.