Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

| Updated on: Jun 30, 2021 | 5:36 PM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. वाघ यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

1) भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. वाघ यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

2) संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. 2185 मराठा तरुणांच्या नियुक्तीसाठी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

3) उपमुख्यंत्री अजित पवार उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते कोरोनास्थिती, खरीप हंगाम याबाबत आढावा घेतील.

4) लसीकरण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणं शक्य नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.