MPSC News : MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधी…
MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधीच वैद्यकीय तपासणीला एमपीएससी उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. २०२३ च्या जाहिरातीच्या मुख्य परिक्षेपासून हा निर्णय होणार लागू
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधीच वैद्यकीय तपासणीला एमपीएससी उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. २०२३ च्या जाहिरातीच्या मुख्य परिक्षेपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तर यानिर्णयानुसार, जानेवारी २०२४ मध्ये या वैद्यकीय तपासणीला सुरूवात होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. दरम्यान हा निर्णय MPSC मुख्य परीक्षा २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.