Imtiaz Jalil On Pahalgam : टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर इम्तियाज जलील थेट बोलले
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर आता टिट फॉर टॅट उत्तर देण्याची वेळ आलेली असल्याचं संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
शेजारच्या देशात प्लॅनिंग होत होती, तर भारतीय यंत्रणा कुठे होती? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले आहेत. त्यावर जलील यांनी प्रतिक्रिया देत हा प्रश्न उपस्थित केला आहे. टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं असंही इम्तियाज जलील यांनी म्हंटलं आहे. असं उत्तर द्या की परत कोणाची भारताकडे बघायची हिम्मत होणार नाही, असंही जलील म्हणाले.
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, श्रीनगरमध्ये ठीक ठिकाणी भारतीय सैन्याचा बंदोबस्त तैनात असतो. सगळीकडे तपासणी होते. मग असं असताना शेजारच्या देशात एवढं सगळ प्लॅनिंग सुरू होतं तेव्हा भारतीय यंत्रणा कुठे होती? दहशतवादी आत कसे आले? त्यांच्याकडे हत्यारं कुठून आले? हे सगळं शोधायला हवं. पण त्याच्या आधी या हल्ल्याला टिट फॉर टॅट उत्तर दिलं पाहिजे. एवढं ठोस उत्तर द्यायची आता वेळ आली आहे की पुन्हा कोणीही भारताकडे बघायची हिम्मत करणार नाही, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल

एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
