एवढे आमदार रातोरात गेले, सरकारला कुणकुण कशी लागली नाही- इम्तियाज जलील
"आज तर लोक असंही म्हणतायत की हे सगळं शिवसेनेनं तर नाही केलं ना? काही आमदार असे आहेत ज्यांना फक्त पैसे पाहिजेत. त्यांचं हिंदुत्वशी काही देणंघेणं नाही."
“मी कालही संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकलं की आमदारांना बळजबरीने गुजरातला नेलं. इतक्या मोठ्या संख्येने आमदार रातोरात सूरतला जातात आणि सरकारला त्याची कुणकुणही लागत नाही. सर्व आमदारांना पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं. आज तर लोक असंही म्हणतायत की हे सगळं शिवसेनेनं तर नाही केलं ना? काही आमदार असे आहेत ज्यांना फक्त पैसे पाहिजेत. त्यांचं हिंदुत्वशी काही देणंघेणं नाही. हा सगळा पैशांचा धंदा आहे. औरंगाबादमधून जे आमदार शिंदेंसोबत गेले, त्यांचं हिंदुत्वशी काहीच देणंघेणं नाही”, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. एकनाथ शिंदेंसोबत आमदारांनी केलेलं पलायन यात शिवसेनेचाही प्लॅन असू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Published on: Jun 22, 2022 03:30 PM
Latest Videos