2024 ला उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात : वरुण सरदेसाई
2024 ला उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात, म्हणून भाजपाने हे सत्तांतर घडवून आणलं, असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला.
मुंबई: 2024 ला उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात, म्हणून भाजपाने हे सत्तांतर घडवून आणलं, असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही, असं वरुण सरदेसाई म्हणाले. “पाच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले, तर 2024 मध्ये पंतप्रधानपदासाठी ते प्रबळ दावेदार ठरु शकतात. उद्धव ठाकरेंच्या मागे लोक उभं राहू शकतात. म्हणून भितीने त्यांनी हे सर्व केलं” असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. ते युवा सेनेचे प्रमुख नेते आहेत. उस्मानाबाद येथील मेळाव्यात ते बोलत होते.
Published on: Sep 10, 2022 06:43 PM
Latest Videos