Kirit Somaiya | कोणत्याही परिस्थितीत मी कोल्हापूरला जाणारच, सोमय्यांची टिव्ही 9 माहिती

| Updated on: Sep 19, 2021 | 7:47 PM

सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसही पाठवली आहे. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

मुंबई : मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुंबईच्या सर्वच चौपाट्यांवर गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचं राजकारणही ढवळून निघालं आहे. मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली. सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसही पाठवली आहे. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सोमय्या आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीला निघाले आहेत. त्यानंतर ते महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरला रवाना होणार आहेत. सोमय्या यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीय.