Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | DTDC कुरिअरमार्फत शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला

| Updated on: Mar 30, 2022 | 7:41 PM

एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी आणि शस्त्र कुणी मागवली, कुणी पाठवली, याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र अचानक एवढा साठा कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे पोलीस (Aurangabad police) यंत्रणा हादरली आहे.

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात एका कुरिअरद्वारे (Swords) मोठा शस्त्रसाठा दाखल झाला आहे. यात तलवारी आणि कुकरीचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी आणि शस्त्र कुणी मागवली, कुणी पाठवली, याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र अचानक एवढा साठा कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे पोलीस (Aurangabad police) यंत्रणा हादरली आहे. शहरात हा शस्त्रसाठा (Arms) आल्याची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो जप्त केला आहे. यामागे कुणाचा हात आहे, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.