‘मविआ’आधीच अजितदादांना महायुतीच्या नेत्यांचाच घेरा? कुणाची काय तक्रार?
बारामतीमध्ये महाविकास आघाडी सोडा आता महायुतीतील नेतेच अजित पवार यांना घेरत असल्याचे बघायला मिळतंय. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरमधील शिंदेंचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपाटले आहेत.
मुंबई, २० मार्च २०२४ : बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला शरद पवार गटाने अजित पवार यांचा जुना व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलंय. बारामतीमध्ये महाविकास आघाडी सोडा आता महायुतीतील नेतेच अजित पवार यांना घेरत असल्याचे बघायला मिळतंय. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरमधील शिंदेंचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपाटले आहेत. अजित पवार यांचे पदाधिकारी दमदाटी करतात म्हणून इंदापूरचे हर्षवर्धन पाटील फडणवीसांकडे तक्रार करताय. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील जर विधानसभेचा शब्द द्याल तरच लोकसभेला अजित पवार यांना मतदान करू असं म्हणताय. दौंडमध्ये असणारे भाजपचे आमदार राहुल कुल अद्याप सक्रिय झालेले नाहीत. त्यात बारामतीमध्ये जाऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचं महत्त्व अधोरेखित करून अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर निशाणा साधत डिवचलं आहे. बघा नेमकं काय म्हणाले….