चिंचवडमध्ये कलाटणी, पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर राहुल कलाटे यांची माघार ?
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचा फोन आला होता अशी कबुली दिली आहे.
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्यामार्फत निरोप पाठविला आहे. राहुल कलाटे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचा फोन आला होता अशी कबुली दिली आहे. ते उद्या भेटणार असून कदाचित साहेब बोलणार असतील. पण, मी दोन वेळा विधानसभा लढलो आहे. इथल्या तरुणांचा आणि नागरिकांचा मला पाठिंबा आहे. त्यांच्या भावनांचा मी अनादर करू शकत नाही. काही झाले तरी मी माघार घेणार नाही. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे असे स्पष्ट केले.
Published on: Feb 09, 2023 06:32 PM
Latest Videos