कराडच्या उंडाळे परिसरात चोरट्यांची दहशत; एकाच रात्रीत 15 घरफोड्या
यामुळे यागावांसह अख्या कराड तालुकाच आता भयभीत झाला आहे. तर पोलीसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कराड : कराड तालुक्यात एका घटनेनं सगळ्यांनाच दहशतीच्या छायेकाली आणलं आहे. येथे एकाच वेळी चार गावात चोरांनी हाथ साफ करत तब्बल 15 घरात चोरी केली. यामुळे यागावांसह अख्या कराड तालुकाच आता भयभीत झाला आहे. तर पोलीसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंडाळे विभागातील चार गावात एका रात्रीत 15 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. या चोरीच्या घटनेमुळे उंडाळे विभागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अधिकची माहिती अशी की, उंडाळे, येळगाव, टाळगाव याच्यासह शेजारच्याच गावात बंद असलेली जवळपास 15 घरांवर चोरट्यांनी हाथ साफ केला. यावेळी येळगाव येथे एक दुकानही चोरट्यांकडून फोडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.