गोव्यात मॉक ड्रील, कोविड प्रतिबंधासाठी उपाययोजना काय?
VIDEO | गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मॉक ड्रिलमध्ये सहभागी, आयोग्य यंत्रणा सज्ज
गोवा : देशात पुन्हा कोरोना व्हायरसने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. अशातच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन कोविड प्रतिबंधक तयारीचा आढावा घेतला आहे. देशात कोविड रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात सरकारी हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रिल करून कोविड प्रतिबंधक तयारीचा आढावा घेण्यात आला. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आरोग्य सचिव अरुण मिश्रा, डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मॉक ड्रिल करत कोविडचा सामना करण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. गेल्या वेळेचा अनुभव आणि उपलब्ध यंत्रणेच्या जोरावर आम्ही सज्ज आहोत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.
Published on: Apr 10, 2023 11:19 PM
Latest Videos