VIDEO : Goa Election Results 2022 | गोव्यात Shivsena-NCPला नोटापेक्षा कमी मतं
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरही विस्तार करण्याचे ध्येय ठेवले होते. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने उमेदवार उभे करत अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी जुंपले होते. शिवसेना खासदार संजय राऊत तर गोव्यात तळ टोकून होते.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरही विस्तार करण्याचे ध्येय ठेवले होते. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने उमेदवार उभे करत अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी जुंपले होते. शिवसेना खासदार संजय राऊत तर गोव्यात तळ टोकून होते. मात्र गोव्यात शिवसेना सपशेल आपटी खावी लागली. तर उत्तर प्रदेशातही शिवसेनाचा फ्लॉप शो होताना दिसतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील एकमेव उमेदवारही पराभवाच्या छायेत आहे. लवकरच पूर्ण निकाल हाती येतील आणि उत्तर प्रदेशात नशीब आजमावणाऱ्या या पक्षांची स्थिती स्पष्ट होईल.
Latest Videos