जयंत पाटील, अजित पवार, आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ आता कल्याणमध्ये कोणाचे लागले ‘भावी मुख्यमंत्री’चे बॅनरच?
याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली होती.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागत आहेत. याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली होती. तोच नागपूरमध्ये आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले, त्यानंतर आता कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून म्होरक्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर लावले जात आहेत. हाच विषय चर्चेचा ठरत आहे.