Karnataka Results 2023 | कर्नाटकात राजकीय हलचालींना वेग, उद्या विधानसभेचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार?
VIDEO| कर्नाटकमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसच्या गोटात हलचालींना वेग
मुंबई : कर्नाटकमध्ये (Karnataka Results 2023) उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय हलचालींना देखील वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसच्या गोटात मोठ्या हलचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी काँग्रेसची बैठक होत आहे. कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. ही बैठक उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये उद्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जो दावा केला जातोय की कर्नाटकमध्ये काँग्रेस मोठा पक्ष म्हणून येणार आहे. तर दोन तासांपासून ही बैठक सुरू असल्याने बैठकीत नेमकी कोणती खलबंत सुरू आहेत. उद्याचा निकाल कोणाच्याबाजून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.