महाराष्ट्रात उडता पंजाब, राज्यातील मोठी शहरं ड्रग्स तस्करांच्या विळख्यात? बघा स्पेशल रिपोर्ट
tv9 Special Report | महाराष्ट्रात उडता पंजाब? मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांना ड्रग्सचा विळखा? मुंबई, पुणे आणि नाशिकमधील तरुणाई संकटात? नाशिकमध्ये सलग दोन दिवसात तब्बल 600 कोटीहून जास्त किमतीचा एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
मुंबई, ९ ऑक्टोबर, २०२३ | महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ड्रग्सचा मोठा साठा आढळून आलाय. नाशिकमध्ये सलग दोन दिवसात तब्बल 600 कोटीहून जास्त किमतीचा एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. मुंबई पोलिसांनी 6 ऑक्टोबरला नाशिकच्या शिंदे गावात एका कारखान्यावर केलेल्या कारवाईत ड्रग्सजा मोठा साठा मिळाला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी याच गावाजवळच्या एका कारखान्यावर छापा टाकला, तेव्हा अजूनच मोठं घबाड त्यांच्या हाती लागलंय. जवळपास दोन महिन्यांपासून नाशिकमधल्या शिंदे गावात ड्रग्स निर्मितीचा धंदा सुरु होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर याप्रकरणी अधिक तपास सुरू झाला. दुसरीकडे पुण्यातही ड्रग्समुळं तरुणाई नासतेय. 30 सप्टेंबरला ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सव्वा दोन कोटी रुपयांचं ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलं होतं.
2020 ला ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला आरोपी ललीत पाटीलचं नाव यात समोर आलं. पण कारवाईच्या दोन दिवस आधीपासून ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ललीत पाटील पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झालाय, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट