Fuel Price Hike | मुंबईत पेट्रोल 115 रुपये 50 पैशांवर तर डिझेलची किंमत 106 रुपये 62 पैशांवर

Fuel Price Hike | मुंबईत पेट्रोल 115 रुपये 50 पैशांवर तर डिझेलची किंमत 106 रुपये 62 पैशांवर

| Updated on: Nov 01, 2021 | 5:41 PM

तेलंगणा सीमेवर असलेल्या धर्माबाद शहरात पेट्रोल 118 रुपये लिटर वर पोहोचले आहे. तर याच धर्माबाद शहरात डिझेल 108 रुपये लिटर दराने विकले जात आहे. इंधनाच्या या वाढलेल्या दरामुळे धर्माबादकर चांगलेच त्रस्त झालेत. त्यामुळे अनेक जण इंधन भरण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात जात आहेत.

तेलंगणा सीमेवर असलेल्या धर्माबाद शहरात पेट्रोल 118 रुपये लिटर वर पोहोचले आहे. तर याच धर्माबाद शहरात डिझेल 108 रुपये लिटर दराने विकले जात आहे. इंधनाच्या या वाढलेल्या दरामुळे धर्माबादकर चांगलेच त्रस्त झालेत. त्यामुळे अनेक जण इंधन भरण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात जात आहेत. धर्माबाद शहराला सोलापूर इथल्या डेपोतून इंधन पुरवठा होतो. हे अंतर अधिकचे असल्याने वाहतूक खर्च वाढल्याने इथे इंधनाचा दर कायमच अधिक असतो.

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. ऑक्टोबर महिना संपेपर्यंत पेट्रोलने प्रतिलीटर 115 तर डिझेलने 110 रुपये प्रतिलीटरची पातळी गाठली आहे. त्यामुळे लवकर इंधनाचे दर 120 रुपयांच्या पलीकडे जातील, असा अंदाज आहे. यामुळे ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत.