Nanded | लोकसहभागातून तयार झालेल्या रस्त्याची बनावट कागदपत्रं, रस्ता हरवल्याची ग्रामस्थांची तक्रार
नांदेडच्या एका गावातील ग्रामस्थांनी चक्क रस्ता हरवल्याची अजब तक्रार केली आहे. लोकसहभागातून तयार झालेल्या रस्त्याबाबत ही तक्रार करण्यात आली आहे.
नांदेडमधील नायगावंच्या मांजरम भागातील पांदण रस्त्ता अतिशय दुर्गम होता. त्यामुळे या रस्त्याचे काम करुन घेण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांनी निधी उचलला. मात्र रस्ता तयार झाल्याची बनावट कागपत्र तयार करुन प्रत्यक्षात रस्त्याचे काम केलेच नाही आणि सरकारने दिलेला निधि गडप केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता हरवल्याची अजब तक्रार करत या प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
Latest Videos