Grampanchyat Election | नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंचाची भवितव्य ठरणार, निवडणुकीसाठी उत्साहात मतदान

Grampanchyat Election | नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंचाची भवितव्य ठरणार, निवडणुकीसाठी उत्साहात मतदान

| Updated on: Sep 18, 2022 | 2:23 PM

Grampanchyat Election | नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा उत्साह दिसून आला.

Grampanchyat Election | नंदुरबार जिल्ह्यातील 149 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Grampanchyat Election ) आज मतदान (Voting) सुरु आहे. राज्यात सत्तांतरानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाचे वर्चस्व दिसून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि थेट जनतेतून सरपंचांची (Sarpanch) निवड करण्यात येणार आहे. यापूर्वीह भाजप शिवसेना सत्तेत असताना त्यांनी थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचे ठरवले होते. त्यानुसार अनेक ग्रामपंचायतींमध्ये जनतेतून थेट सरंपचाची निवड करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला.

आता शिंदे गटासोबत भाजपने पुन्हा सत्ता काबीज केल्यानंतर पहिला निर्णय जनतेतून थेट सरपंच निवडीचा घेण्यात आला होता. त्यानुसार आता जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीत सरपंचाची थेट निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिंदे गट, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडी यांनी उमेदवार उभे केले आहेत.

Published on: Sep 18, 2022 02:23 PM