Nashik मध्ये ओढा गावाजवळ धावत्या कारने घेतला पेट
गेल्या काही दिवसांपासून कार अचानक पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चालकांमध्ये चिंता वाढली आहे. ओढा गावाजवळ पेट्रोल पंपाबाहेर ही घटना घडली. जर हीच घटना पेट्रोल पंपावर घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता.
नाशिक (Nashik) जवळच्या ओढा गावाजवळ मंगळवारी दुपारी बर्निंग कारचा (Burning car) थरार पाहायला मिळाला. गावातल्या पेट्रोल पंपाबाहेरच (petrol pump) एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. यामुळे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. कार चालकाने तात्काळ कारमधून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या माध्यमातून कारला लागलेली आग विझवली. पण या कारला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कारमधील चालकही सुखरूप आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कार अचानक पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चालकांमध्ये चिंता वाढली आहे. ओढा गावाजवळ पेट्रोल पंपाबाहेर ही घटना घडली. जर हीच घटना पेट्रोल पंपावर घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता. कारण पेट्रोल भरायलाही या ठिकाणी चांगली गर्दी असते. खरे तर एक मोठा अपघात होता-होता राहिला म्हणावे लागेल.