Crime | Navi Mumbai | बापानेच पोरावर गोळ्या झाडल्या, मुलाचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला!
नवी मुंबईमध्ये एका बापानेच स्वत:च्या पोराला गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेन संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरुन बाप-लेकामध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापाच्या भरात भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. मोठा मुलगा विजय पाटीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर धाकटा मुलगा सुजय पाटील जखमी आहे.
निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलने गुन्हा मान्य केला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर जखमी झालेला मोठा मुलगा विजय पाटीलचे इंद्रावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर जखमी सुजयवर उपचार सुरु आहेत.
Latest Videos