ST Strike | अत्यंत वेदनादायी! इचलकरंजीत आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ST Strike | अत्यंत वेदनादायी! इचलकरंजीत आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

| Updated on: Jan 10, 2022 | 6:34 PM

आता अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येते आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या 22 संघटनांचे प्रतिनिधी, अनिल परब आणि शरद पवार यांच्या बैठक झाली होती. त्यानंतर सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यात ही अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे.

इचलकरंजीमधून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासोबत एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. इचलकरंजीमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शरणाप्पा गुंजाळे असं मृत एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येते आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या 22 संघटनांचे प्रतिनिधी, अनिल परब आणि शरद पवार यांच्या बैठक झाली होती. त्यानंतर सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यात ही अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे.

Published on: Jan 10, 2022 06:29 PM