'माझे 800 भाऊ, एक... मोदी त्या आरोपांचे काय झाले?', ससंदेत सुप्रिया सुळे कडाडल्या

‘माझे 800 भाऊ, एक… मोदी त्या आरोपांचे काय झाले?’, ससंदेत सुप्रिया सुळे कडाडल्या

| Updated on: Sep 18, 2023 | 9:55 PM

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी पक्षावर घोटाळेबाज पार्टी असा आरोप केला होता. त्यावरून संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांना टोला लगावला. सुप्रिया सुळे यांनी यावेळी एक नाही तर माझे ८०० भाऊ असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : 18 सप्टेंबर 2023 | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भ्रष्टाचारी पार्टी अशी टीका केली होती. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे Naturally Courrept Party असे ते म्हणाले होते. तसेच घोटाळ्यांची चौकशी करू असेही ते म्हणाले होते. मोदी यांनी केलेल्या त्या आरोपांचे काय झाले? घोटाळे आणि भ्रष्टाचार याचे आरोप केले होते. त्याची तुम्ही चौकशी करा. माझा तुम्हाला पूर्ण पाठींबा आहे. आम्ही तुम्हाला १०० टक्के सहकार्य करू. मी हात जोडून विनंती करते की मोदी यांची ती इच्छा पूर्ण करा, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांना लगावला. संसदेत विशेष अधिवेशन सत्रात त्या बोलत होत्या. इरिगेशन आणि बँक असे दोन घोटाळयाबद्दल मोदी बोलले होते. फक्त दोनच नाहीत असे आणखी काही घोटाळे असतील तर तेही बाहेर काढा. मोदी यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला आहे. त्यांना सहकार्य करू असे त्यांनी सांगितले. याचवेळी अन्य खासदारांनी अजित पवार तुमचे भाऊ आहेत असे म्हटले. त्यावर हजरजबाबीपणे उत्तर देत माझे ८०० भाऊ आहेत. संसदेतील सगळे माझे भाऊ आहेत. एक थोडाच आहे, असा टोला लगावला.

Published on: Sep 18, 2023 09:55 PM