Sangli मध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

| Updated on: Feb 17, 2022 | 7:36 PM

जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात 1956 साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु 16 वर्षापूर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता.

सांगली : सांगलीच्या जत शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये चबुतरा बसवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून आजी आणि माजी आमदार मध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे जत शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जत शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात 1956 साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु 16 वर्षापूर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणे व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते व शिवप्रेमीने घेतला होता.