सोलापूर लोकसभेत प्रणिती शिंदे Vs राम सातपुते? प्रचारास सुरूवात तर तयारीला लागण्याच्या पक्षाच्या सूचना

सोलापूर लोकसभेत प्रणिती शिंदे Vs राम सातपुते? प्रचारास सुरूवात तर तयारीला लागण्याच्या पक्षाच्या सूचना

| Updated on: Mar 18, 2024 | 11:32 AM

सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास पक्क झालं आहे. अशातच त्याविरोधात भाजपकडून राम सातपुते यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय. राम सातपुते यांना तयारीला लागण्याच्या भाजपकडून सूचना

मुंबई, १८ मार्च २०२४ : सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास पक्क झालं आहे. अशातच त्याविरोधात भाजपकडून राम सातपुते यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय. राम सातपुते यांना तयारीला लागण्याच्या सूचना भाजपने दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्याविरोधात मविआकडून प्रणिती शिंदे यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे. सोलापूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य आहेत. मात्र गेल्या ५ वर्षापासून त्यांनी मतदारसंघात कोणताही संपर्क न ठेवल्याने त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे विश्लेषक सांगताय. म्हणून यंदा भाजपकडून राम सातपुते आणि अमर साबळे यांची नावं चर्चेत आहेत. त्यातच आता सातपुते यांचं नावं प्रबळ मानलं जात असून ते सध्या माळशिरसमधून भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीकरत राम सातपुते यांना तिकीट मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Mar 18, 2024 11:32 AM