नाशिकमध्ये ठाकरे गट हादरला! एकनाथ शिंदे यांच्या सेनेत नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
VIDEO | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुणी-कुणी केला प्रवेश?
मुंबई : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटातील नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गट हादरल्याचे म्हटलं जात आहे. नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील काही नेत्यांसह नवी मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. सुरगाणा नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, नगरसेविका अरुणाताई वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तर नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.