प्रभू श्रीरामच्या घोषणा अन् मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या जयजयकारासह वारकरी निघाले अयोध्या वारीला
VIDEO | राम कृष्ण हरीच्या जयघोषात वारकरी शिवसैनिकांचा अयोध्याच्या दिशेनं प्रवास
मध्यप्रदेश : नाशिकहून निघालेल्या अयोध्येसाठीच्या विशेष ट्रेनमध्ये वारकरी संप्रदायातील शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाच्या घोषणा तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या जयजयकारासह रामकृष्ण हरीच्या नामाचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात हे सर्व वारकरी शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहे. तर अयोध्या स्पेशल ट्रेनमध्ये साधारण दोन हजार शिवसैनिक असून ते अयोध्येला जात आहेत. उद्या सकाळी ही अयोध्या स्पेशल ट्रेन अयोध्येत दाखल होणार असून या वारकरी संप्रदायातील शिवसैनिकांचा उत्साह कायम आहे. अयोध्येचा प्रवास सुरू असताना या वारकरी शिवसैनिकांकडून भजन आणि अभंगाचा नाद या अयोध्या स्पेशल ट्रेनमध्ये दुमदुमताना दिसत आहे.
Published on: Apr 08, 2023 04:52 PM
Latest Videos