गोपीचंद पडळकर यांनी ‘या’ शब्दात काढली राष्ट्रवादी काँगेसची लायकी
शरद पवार यांचे ३ खासदार आहेत ते राहिले म्हणजे बरं, नाही तर शुन्यावर यायचं.
पुणे : सी व्होटर सर्व्हेच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप बहुमतापासून दूर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या पक्षाची लायकीच काढली आहे.
शरद पवार यांचे ३ खासदार आहेत ते राहिले म्हणजे बरं, नाही तर शुन्यावर यायचं. शरद पवार यांनी भाजपची चिंता करण्याची गरज नाही. त्याआधी त्यांनी आपल्या पक्षाची लायकी किती आहे. पात्रता किती आहे, त्यानुसार बोलायला हवं असा टोला त्यांनी लगावला आहे.
आमचे गणित ४०० कडे चालले आहे. तुमचे अजून ४ कडे जाईना. दोन शून्याचा फरक आहे. त्यामुळे त्यांनी तत्वज्ञान सांगण्यापेक्षा पार्टी राहतेय की जातेय? ती कुठे विसर्जित करायची यावाट विचारमंथन करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय.
Published on: Jan 28, 2023 03:59 PM