राममंदिराचे उद्घाटन आणि इंडिया आघाडीत स्फोट एकाच वेळी होईल, खासदार नवनीत राणा यांचा दावा
गेली साडे पाचशे वर्षे अयोध्येत राम तंबूमध्ये रहात होता. त्याचे मंदिर बांधण्याचे काम अखरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखविले. देशातील कोट्यवधी जनता मोदींच्या पाठीशी आहे. येत्या 22 जानेवारी राम मंदिराचे उद्घाटन होईल आणि इंडिया आघाडीत स्फोट होईल आणि महाआघाडीतील दोन पक्ष मोदींना पाठींबा देतील असा दावा राणा दाम्पत्याने केला आहे.
अमरावती | 31 डिसेंबर 2023 : राम मल्ला इतकी वर्षे तंबूत रहावे लागले. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे रामाचे मंदिर तयार होत आहे. एकदा का राम मंदिराचे उद्घाटन झाले की विरोधकांची इंडिया आघाडीत स्फोट होऊन ती फूटेल असा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. आज सर्व देश मोदी यांच्या मागे आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यातील दोन पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोदींना पाठींबा देईल असे आमदारर रवी राणा यांनी म्हटले आहे. साल 2024 नंतर दहशदवादी दाऊद इब्राहीम, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना देशात आणलं जाईल असेही रवी राणा यांनी सांगितले. 10 जानेवारीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री रहाणार आहेत. विजय वडेट्टीवार कॉंग्रेस फुटू नये म्हणून अशी दिशाहीन वक्तव्य करीत असतात असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 31, 2023 05:15 PM
Latest Videos