मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेला मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड नेमका आहे तरी कसा?

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेला मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड नेमका आहे तरी कसा?

| Updated on: Mar 11, 2024 | 12:51 PM

मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्धाटन करण्यात आलं असून या कोस्टल रोडवरून प्रवास केल्याने ३० मिनिटांचं अंतर अवघ्या १० मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड आज लोकार्पण

मुंबई, ११ मार्च २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्धाटन करण्यात आलं असून या कोस्टल रोडवरून प्रवास केल्याने ३० मिनिटांचं अंतर अवघ्या १० मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड आज लोकार्पण झालं असल्याने उद्यापासूनच मुंबईकरांना या कोस्टल रोडचा वापर करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे कोस्टल रोडवर प्रवास करता कोणतेही शुल्क टोल आकारले जाणार नसून या रोडवरील प्रवास हा पूर्णपणे मोफत असणार आहे. या कोस्टल रोडच्या मार्गिकेमुळे दक्षिण मुंबईला थेट उत्तर मुंबईशी जोडले गेले आहे. दरम्यान, कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकलाही कनेक्ट होणार आहे. तर पुढे दहिसरपर्यंत हाच मार्ग कोस्टल रोड जाणार आहे. कोस्टल रोडवरून प्रवास करताना ताशी ८० किमी, तर बोगद्यातून ताशी ६० किमी वेगमर्यादेचं पालन करावं लागणार आहे. कोस्टल रोडवर ट्रेलर, मिक्सर, दुचाकी, तीनचाकी आणि सायकलला प्रवेश बंदी असणार आहे.

Published on: Mar 11, 2024 12:51 PM