VIDEO : Aurangabad मध्ये एकाच दिवशी दोन छेडछाडीच्या घटना, महिलेला विवस्त्र करून माहराण झाल्याची माहिती

VIDEO : Aurangabad मध्ये एकाच दिवशी दोन छेडछाडीच्या घटना, महिलेला विवस्त्र करून माहराण झाल्याची माहिती

| Updated on: Aug 28, 2021 | 3:07 PM

औरंगाबाद शहरामध्ये महिलांना छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा एका महिलेची छेडछाड केली गेली आहे. आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले.

औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा रस्त्यावरच एका महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड करणे आणि कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी या विवस्त्र महिलेला स्वतःचे कपडे दिले. आरोपींनी पीडित महिलेचे कपडे फाडून जबर मारहाण केली. तसेच या महिलेच्या शरीरावर चावाही घेतला आहे.