sonu sood | अभिनेता सोनू सूदवर आयकर छाप्याच्या प्रकरणाला वेग, 28 ठिकाणी छापे
सोनू सूदने परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीदरम्यान काही कागदपत्रे मिळाली आहेत.
आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात मोठ्या प्रमाणात हेरफेर सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे. आज (18 सप्टेंबर) इनकम टॅक्स डिपार्टमेंटंने यावर अधिकृत वक्तव्य दिले आहे.
सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाची ही कारवाई सलग तीन दिवस चालली. बातमीनुसार, आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने छापे घातल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या इतर परिसरात शोध घेताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने म्हटले आहे की, अभिनेत्याने बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत.