Nashik | नाशकात आयकर विभागाची मोठी धाड, कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त
उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाला अक्षरशः अलीबाबाची गुहा सापडली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकूण 175 अधिकाऱ्यांनी तब्बल 32 ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी सापडलेला पैसा 12 तास मोजला आणि संपत्तीची एकूण मोजणी करायला तब्बल 5 दिवस लागले.
उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाला अक्षरशः अलीबाबाची गुहा सापडली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकूण 175 अधिकाऱ्यांनी तब्बल 32 ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी सापडलेला पैसा 12 तास मोजला आणि संपत्तीची एकूण मोजणी करायला तब्बल 5 दिवस लागले. येणाऱ्या काळात हे कारवाई सत्र पुन्हा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बडे मासे अस्वस्थ झाले असल्याची चर्चा सुरू आहे.
उत्तर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली कारवाई सध्या कुतुहलाचा विषय झाली आहे. इतकी मोठी कारवाई तब्बल पाच दिवस चालली. मात्र, त्याची साधी खबरही बाहेर आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे तर तब्बल 175 अधिकाऱ्यांनी एकचावेळी 32 ठिकाणी ही कारवाई केली. त्यामुळे कुणालाही हलचाल करता आली नाही. बडे मासे आपाओप जाळ्यात अडकले. विशेषतः ज्यांच्यानावार या बड्या माशांनी संपत्ती घेऊन ठेवली आहे, त्यांनाही धरल्यामुळे साऱ्या नाड्या एकत्रित आवळल्या गेल्या.