दोन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू
तिथले स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे तिथला पोलिस बंदोबस्त अजून वाढवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला तिथं अजून शिवसैनिक असल्याची माहिती आहे.
मुंबई – शिवसेना (shivsena) नेते व मुंबई (mumbai) मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी दोन दिवसांपासून छापेमारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ही छापेमारी अद्याप सुरू असल्याने अनेकांच्या भुवय्या नक्कीचं उंचावल्या असणार कारण तिथं काय सापडलं हे अद्याप आयकर विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. काही अधिकारी तिथून निघून गेले आहेत. तर काही अधिकारी अजून त्यांच्या घरीचं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथले स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे तिथला पोलिस बंदोबस्त अजून वाढवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला तिथं अजून शिवसैनिक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तिथल्या अनेक शिवसैनिकांची समजूत देखील काढली आहे.
Published on: Feb 27, 2022 09:30 AM
Latest Videos