बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयात साक्षीदार तपासणीत ‘त्या’ अधिकाऱ्याचा जबाब, काय आहे प्रकरण?
VIDEO | बच्चू कडू यांनी मंत्रालयात समाज कल्याण अधिकाऱ्यांना मारहाण केलेल्या अधिकाऱ्याचा न्यायालयात नोंदविला जबाब
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. मंत्रालयात समाज कल्याण अधिकारी यांना मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयात साक्षीदार तपासणीला सुरूवात झाली. यामध्ये मंत्रालयात मारहाण केलेल्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली असून त्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तर या प्रकरणात पुढील सुनावणीवेळी बच्चू कडू यांना हजर राहण्याचे सक्त निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या विरोधात मंत्रालयात समाज कल्याण अधिकारी यांना मारहाणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. मंत्रालयामध्ये 26 सप्टेंबर 2018 रोजी उप सचिव प्रदीप चंद्रन यांना शिवीगाळ आणि लॅपटॉपने मारहाणी केल्याचं प्रकरण घडलं होतं. त्याविरोधात संबंधित अधिकारी यांच्या तक्रारीवरून मरिन ड्रॉईव्ह पोलीस ठाण्यात बच्चू कडू विरोधात भादवी कलम 353, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.