Karad Rain | कराडच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
तारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोंडवळी आणि मोजेझोर इथेही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणातील दुर्घटनेत आतापर्यंत एकूण दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
कराड : मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक सहा वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे येथे दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी तीन ठिकाणी जिवीतहानी झाल्याची माहिती आहे. आंबेघर गावात तर प्रचंड भयानक घटना घडलीय. आंबेघर गावातील तब्बल 14 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मिरगावात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फक्त पाटण तालुक्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोंडवळी आणि मोजेझोर इथेही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणातील दुर्घटनेत आतापर्यंत एकूण दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.