समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगावर आता राहणार वॉच

समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगावर आता राहणार वॉच

| Updated on: Jan 29, 2023 | 8:39 AM

अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर स्पीड मोजणाऱ्या इंटरसेप्टर वाहनांची संख्या वाढवली

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुसाट वेगावर आता वॉच राहणार आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावर वाहनांचा स्पीड मोजणाऱ्या इंटरसेप्टरची संख्या वाढवली जाणार आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर रोजी उद्घाटन केल्यानंतर नागपूर-शिर्डी असा पहिला टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता वेगवान वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. तर समृद्धी महामार्गावर नियमांचं पालन करा, अन्यथा दंड भरा, असे आवाहन देखील वारंवार केले जात आहे. मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे. एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून जाणारा हा समृद्धी महामार्ग आहे.

Published on: Jan 29, 2023 08:39 AM