दहशतवाद्यांकडून नागपूरची रेकी, संघ मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ

दहशतवाद्यांकडून नागपूरची रेकी, संघ मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ

| Updated on: Jan 08, 2022 | 10:47 PM

राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर (Nagpur) आता दहशतवाद्यांच्या (Terrorist) टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. कारण जैश ए मोहम्मद (Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेनं नागपुरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संघ मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर (Nagpur) आता दहशतवाद्यांच्या (Terrorist) टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. कारण जैश ए मोहम्मद (Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेनं नागपुरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट (High Alert) जारी करण्यात आलाय. तसंत नागपूर पोलीसही सतर्क झाले आहे. याचा पार्श्वभूमीवर नागपुरातील संघ मुख्यलयाच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरिपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.