उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, त्यामुळे ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात; भाजपच्या नेत्याचं प्रत्त्युत्तर

| Updated on: Mar 27, 2023 | 8:26 AM

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते माझ्या नावाचा उल्लेख वारंवार करत आहेत, असं म्हणत भाजपच्या नेत्याने जोरदार टीका केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

इंदापूर, पुणे : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते माझ्या नावाचा उल्लेख वारंवार करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्यावर अन्याय झाला होता. म्हणून चार वर्षांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडला. गेल्या 25 वर्षात माझी एकही चौकशी सुरू नाहीये. आम्ही स्वाभिमानी होतो म्हणून भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात गेलोय, असंही हर्षवर्धन पाटील म्हणालेत. उद्धव ठाकरेकडे आता बोलण्यासारखे काही राहिलेलं नाही म्हणून ते बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं हर्षवर्धन पाटील म्हणालेत.

‘पवार नावाची कीड लागली आहे’; गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील; शिवसेनेच्या नेत्याचा दावा