Indapur चे आमदार आणि राज्यमंत्री Dattatray Bharne यांचा मटणावर ताव

| Updated on: Feb 19, 2022 | 12:28 AM

इंदापूर तालुक्यातील निरवांगी या गावी गुरुवारी सायंकाळी 30 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभानंतर जेवणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

इंदापूर : राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत पंगतीत बसून जेवण केले.
इंदापूर तालुक्यातील निरवांगी या गावी गुरुवारी सायंकाळी 30 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभानंतर जेवणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांच्या पंगती बसल्या होत्या व उपस्थित पदाधिकाऱ्यांना जेवणासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चक्क गावकऱ्यांच्या सोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे भरणे यांचा साधेपणा पुन्हा समोर आला आहे.