INDIA Alliance च्या मुंबईतील बैठकीत नेमकं काय ठरलं? पंतप्रधान मोदी यांच्याशी सामना करणार?

INDIA Alliance च्या मुंबईतील बैठकीत नेमकं काय ठरलं? पंतप्रधान मोदी यांच्याशी सामना करणार?

| Updated on: Sep 01, 2023 | 11:20 PM

tv9 Special Report | 'जुडेगा भारत, जितेगा इंडिया', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 'इंडिया', मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीनं नेमकं काय ठरवलं? इंडिया आघाडीची 13 जणांची समन्वय समिती स्थापन

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आणि मोदींविरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीनं अजेंडा सेट केलाय. इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकं काय काय झालं. तर जुडेगा भारत, जितेगा इंडिया म्हणत 28 विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. इंडिया आघाडीच्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब झालं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रकिया ताबडतोब सुरु केली जाणार. गिव्ह अँड टेक या आधारावर काही जागांची अदलाबदली होणार आहे. लवकरच देशातल्या विविध ठिकाणी सभांचं आयोजन केलं जाणार आहे. तर जुडेगा भारत, जितेगा इंडिया या मथळ्याखाली प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. यासह इंडिया आघाडीची 13 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत 13 जणांच्या समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, ठाकरे गटाकडून संजय राऊत, डीएमकेकडून एम.के.स्टॅलिन, काँग्रेसकडून के.सी.वेणुगोपाल, आरजेडीकडून तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसकडून अभिषेक बॅनर्जी, आपकडून राघव चढ्ढा, समाजवादी पार्टीकडून जावेद अली खान, जेडीयूकडून लल्लन सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाकडून हेमंत सोरेन, सीपीआयकडून डी.राजा, नॅशनल कॉन्फरन्सकडून ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीकडून मेहबुबा मुफ्ती या समन्वय समितीत असणार आहे.

Published on: Sep 01, 2023 11:20 PM