विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत वंचित सहभागी होणार? पडद्यामागं काय घडतंय?
tv9 marathi Special Report | इंडिया आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सहभागासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं चर्चा सुरू असताना 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचा भटजी जोपर्यंत तारीख काढत नाही, तोपर्यंत बोलणी होणार नाही', प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले?
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | इंडिया आघाडीकडून वंचित आघाडीला सहभागासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद सुरु आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इंडिया आघाडीकडून वंचित आघाडीला सहभागासाठी निमंत्रण दिलं जाईल का? या प्रश्नावर त्यांचं स्वागतच असेल. तर या निमंत्रणाबाबत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याची आमची इच्छा आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचा भटजी जोपर्यंत तारीख काढत नाही. तोपर्यंत बोलणी होणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. बघा नेमंक काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?