शिवरायांचा 'तो' पुतळा 8 महिन्यातच कोसळला, या घटनेवर नौदल नेमकं काय म्हणतंय? बघा पहिली प्रतिक्रिया

शिवरायांचा ‘तो’ पुतळा 8 महिन्यातच कोसळला, या घटनेवर नौदल नेमकं काय म्हणतंय? बघा पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Aug 27, 2024 | 12:46 PM

मालवणात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमी आणि विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाने उभारला होता. हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित असल्याने त्यांची पहिली प्रतिक्रिया काय? जाणून घ्या...

मालवणच्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा नौदल दिनी 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आला होता. पण अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, राज्य सरकारने शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणासंदर्भात दखल घेत दोन व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठेकेदार आणि आर्टिसरी कंपनीचे मालक जयदीप आपटे तसच स्ट्रक्चरल कंसल्टेंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यावर नौदलाकडूनही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतीय नौदलाकडून या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. नौदलाकडून चौकशी करण्याबरोबरच पुतळा तातडीने उभारण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलली जाणार असून लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नौदल दिनी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करणार असल्याचेही नौदलाकडून सांगण्यात आले आहे.

Published on: Aug 27, 2024 12:46 PM