नेपाळमध्ये 22 प्रवाशांसह विमान बेपत्ता; विमानात होते 4 भारतीय
नेपाळमधील हे विमान (Nepal Plane Missing) 22 प्रवाशांना घेऊन झेपावलं होतं. मात्र या विमानाशी आता कोणताही संपर्क होऊ शकत नसल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जातेय.
22 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नेपाळमधील हे विमान (Nepal Plane Missing) 22 प्रवाशांना घेऊन झेपावलं होतं. मात्र या विमानाशी आता कोणताही संपर्क होऊ शकत नसल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जातेय. एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 22 प्रवाशांमध्ये 4 भारतीय होते, अशीही माहिती समोर आली आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या हवाल्यानं एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. नेपाळ गृहमंत्रालयाकडून (Nepal Home Ministry) दोन खासगी हेलिकॉप्टर शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. नेपाळच्या सैन्याकडूनही शोध कार्य केलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Published on: May 29, 2022 02:55 PM
Latest Videos