IND vs SA Match | टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार
भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे पण केवळ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल. अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे पण केवळ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत फक्त तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे तर टी-20 मालिका नंतर आयोजित केली जाईल. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे या दौऱ्यावर काळे ढग दाटून आले होते, हा दौरा पुढे ढकलला जाईल किंवा रद्द केला जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु बीसीसीआयने काही बदल करून हा दौरा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ टी-20 मालिका पुढे ढकलली आहे. भारताचा हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जय शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “बीसीसीआयने सीएसएला सांगितले आहे की, भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. त्याचवेळी चार सामन्यांची टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल.