T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार? फडणवीसांचा थेट चौकार
जळगावात बोलताना फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. विधानसेभेची मॅच महायुतीच...
T20 वर्ल्डकपमधील भारताच्या दमदार आणि ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात येतंय. भारतीय संघाच्या या कामगिरीचं देशातील अनेक राजकीय नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत अपराजित ! सूर्यकुमार यादवचा गेमचेंजर कॅच…बुमराह – हार्दिकची बॉलिंग आणि विराटची इनिंग, कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्त्वात संपूर्ण टीमने भारताला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेता बनविल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! असे म्हटलं. तर जळगावात बोलताना फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. विधानसेभेची मॅच महायुतीच जिंकणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करत विश्वास व्यक्त केला आहे. आमची मॅच टीम इंडियासारखीच असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकंच नाहीतर अर्जूनाचं लक्ष्य मासा होता तर आमचं लक्ष विधानसभा असणार असल्याचं वक्तव्य शरद पवार म्हणाले.