T20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट अन् रोहितचा टी-20 क्रिकेटला अलविदा, बघा कशी होती कारकीर्द?

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट अन् रोहितचा टी-20 क्रिकेटला अलविदा, बघा कशी होती कारकीर्द?

| Updated on: Jul 01, 2024 | 10:35 AM

२०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारूण पराभवानंतर सर्वांचेच मन दुखले होते. पण बरोबर एक वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो देशवासीयांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. टी-२० विश्वचषकावर भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं

भारतानं टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवत १७ वर्षांनंतर विश्वचषक आपल्या नावावर केला. २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारूण पराभवानंतर सर्वांचेच मन दुखले होते. पण बरोबर एक वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो देशवासीयांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. टी-२० विश्वचषकावर भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आणि जगभरात एकच जल्लोष करण्यात आला. मात्र या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रविंद्र जडेजा याने देखील टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी उत्कृष्ट निरोप कोणताही असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्यानं दिली आहे. जाणून घ्या रोहित शर्मा आणि विरोट कोहली यांची टी-२० क्रिकेटमधील कारकीर्द…

Published on: Jul 01, 2024 10:35 AM