Rajasthan | राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले. हवाई दलाच्या विमानाने राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केले यावेळी दोन्ही नेते विमानात उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले. हवाई दलाच्या विमानाने राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केले यावेळी दोन्ही नेते विमानात उपस्थित होते. इंडियन एअर फोर्सचं सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान आणि C-130J सुपर हर्क्युलस विमानांचा यामध्ये समावेश होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा हवाई रनवे पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर आहे. भारत कोणत्याही आव्हानासाठी नेहमीच तयार असतो हे हवाई रनवेमुळे स्पष्ट होतं आहे. तीन किलोमीटर लांबीचा हा रनवे 19 महिन्यांत तयार करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातही हे काम पूर्ण केले गेले आहे. या आपत्कालीन लँडिंग फील्डच्या बांधकामामुळे मनात उत्साह, सुरक्षिततेबद्दल आत्मविश्वासही निर्माण होत असल्यानं आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष दिवस आहे.