चॅम्पियन टीम इंडियानं घेतली PM मोदींची भेट, तब्बल दीड तास संवाद, काय झाली चर्चा? बघा व्हिडीओ

चॅम्पियन टीम इंडियानं घेतली PM मोदींची भेट, तब्बल दीड तास संवाद, काय झाली चर्चा? बघा व्हिडीओ

| Updated on: Jul 04, 2024 | 2:00 PM

ICC T20 World Cup team meet PM Modi : एअर इंडियाच्या विशेष विमानाने टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून थेट आपल्या मायदेशी परतले. दिल्लीला पोहोचल्यानंतर हे खेळाडू हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली.

T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून टीम इंडिया अखेर मायदेशी परतला आहे. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तिथेच अडकली होती. मात्र एअर इंडियाच्या विशेष विमानाने टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून थेट आपल्या मायदेशी परतले. दिल्लीला पोहोचल्यानंतर हे खेळाडू हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यावेळी त्यांनी मोदींसह ब्रेकफास्ट केला आणि काही हलक्या-फुलक्या गप्पा मारल्यात. दरम्यान, टीम इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी मोदींसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी सर्व खेळाडूंनी आपली जर्सी घातली होती. यावेळी जवळपास दीडतास मोदी आणि टीम इंडियामध्ये संवाद सुरू होता. इतकंच नाहीतर टीमने आपल्या ट्रॉफीसह मोदींसोबत फोटोसेशनही केलं.

Published on: Jul 04, 2024 01:54 PM