नागपूर-मुंबई प्रवासात प्रवाशानं हवेतच विमानाचा दरवाजा उघडला अन्...

नागपूर-मुंबई प्रवासात प्रवाशानं हवेतच विमानाचा दरवाजा उघडला अन्…

| Updated on: Jan 30, 2023 | 8:29 AM

विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, पण क्रू मेंबर्स आणि कॅप्टनच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला

विमान प्रवासात प्रवाशांच्या विचित्र वर्तनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. असाच धक्कादायक प्रकार इंडिगो फ्लाइट 6E 5274 मधून समोर आला आहे. नागपूरहून मुंबईला येत असलेल्या इंडिगो फ्लाइट 6E 5274 मधील एका प्रवाशाने विमान टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळानं आपत्कालीन दरवाजा (इमर्जन्सी एक्झिटचे कव्हर) उघडण्याचा प्रयत्न केला.

विमान आकाशात होते आणि विमान लँडिंगच्या तयारीत असताना प्रवाशाने आपत्कालीन एक्झिटचे कव्हर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विमानात उपस्थित असलेल्या क्रू मेंबरने कॅप्टनला प्रवाशाच्या या कारनाम्याची माहिती दिली आणि त्यांच्या सावधानतेने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या सुरक्षित ऑपरेशनबाबत आरोपी प्रवाशाच्या वर्तणुकीबाबत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. तर या प्रवाशाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Published on: Jan 30, 2023 08:29 AM